मेंदू : व्युत्पत्ती आणि तुलनात्मक भाषाशास्त्र
सजीवसृष्टीतले सगळ्यांत गुंतागुंतीचे इंद्रिय जो मेंदू, त्याला इंग्रजी भाषेत Brain म्हणतात. Brain या शब्दाचे मूळ काय? नव्या ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये (1998) Brain ची व्याख्या, “पृष्ठवंशीय प्राण्यांच्या कवटीमध्ये असलेले, जाणिवांचा समन्वय आणि बौद्धिक व चैतीय क्रिया पार पाडणारे मृदू चेता-उतीपासून बनलेले इंद्रिय” अशी केली आहे. इ.स.पूर्व 5 व्या शतकात ‘मेंदू हा संवेदनांसाठी आवश्यक आहे.’ असे ग्रीक तत्त्वज्ञ …